सोनं विकलं नाही; आरबीआयनं वृत्त फेटाळलं https://ift.tt/369t1AM https://ift.tt/369t3bS - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, October 27, 2019

सोनं विकलं नाही; आरबीआयनं वृत्त फेटाळलं https://ift.tt/369t1AM https://ift.tt/369t3bS

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
मुंबई: रिझर्व्ह बॅंकेकडील () आता विक्रीला काढण्यात आला असून, रिझर्व्ह बॅंकेने जुलैपासून बाजारात १.१५ अब्ज डॉलर केली आहे, असं वृत्त माध्यमांमध्ये पसरलं होतं. मात्र, आरबीआयनं हे वृत्त फेटाळून लावलं आहे. आरबीआयनं सोन्याची विक्री किंवा कोणताही व्यापार केलेला नाही, असं स्पष्टीकरण बँकेनं दिलं आहे. रिझर्व्ह बँकेनं तीन दशकांनंतर पहिल्यांदाच सोन्याची विक्री केली आहे, तसंच जालान समितीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर यावर्षी ऑगस्टपासून सोन्याच्या व्यापारात सक्रिय झाल्याचं वृत्त माध्यमांमध्ये पसरलं होतं. त्याबाबत आज रविवारी रिझर्व्ह बँकेनं ट्विटद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे. 'आरबीआय सोन्याची विक्री किंवा व्यापार करत असल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं आहे. पण आरबीआयकडून सोन्याची विक्री किंवा सोन्याचा व्यापारही केला जात नाही,' असं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. आरबीआयने जुलैपासून एकूण ५.१ अब्ज डॉलरचे सोने खरेदी केले असून, १.१५ अब्ज डॉलर सोन्याची विक्री केल्याचं वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. आरबीआयकडे ऑगस्टच्या अखेरपर्यंत १९.८७ दशलक्ष औंस कोटी सोने होते. तर ११ ऑक्टोबर रोजी फॉरेक्स रिझर्व्हमध्ये फक्त २६.७ अब्ज डॉलर सोने होते, असे दोन दिवसांपूर्वी आलेल्या वृत्तात म्हटलं होतं. जालान समितीच्या शिफारशीनुसार, आरबीआय निर्धारित लाभापेक्षा अधिकचा लाभ सरकारसोबत शेअर करू शकते, असंही त्यात म्हटलं होतं. मात्र, आरबीआयनं हे वृत्त फेटाळून लावलं आहे. या केवळ अफवा पसरवण्यात आल्या आहेत, असं बँकेनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, कर संकलनातील तूट भरून काढण्यासाठी नुकतेच आरबीआयने जालान समितीच्या शिफारशींनुसार राखीव निधीतील १.७६ लाख कोटी केंद्र सरकारला दिले होते. मंदीच्या स्थितीमुळं सरकारला मिळणाऱ्या महसुलात घट झाल्याचं दिसतं. त्यामुळं वित्तीय तूट वाढण्याची भीती आहे. ती काही प्रमाणात कमी करण्यासाठी सरकारने रिझर्व्ह बॅंकेकडे घसघशीत लाभांशाची अपेक्षा व्यक्‍त केली असतानाच, बँकेकडून सोनं विक्रीला काढलं जात असल्याचं वृत्त धडकल्यानं विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

https://ift.tt/369t1AM

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages