गोदरेज घराण्यात मतभेद; संपत्तीचे होणार वाटप! https://ift.tt/2X7m65c https://ift.tt/2XgT4VW - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 27, 2019

गोदरेज घराण्यात मतभेद; संपत्तीचे होणार वाटप! https://ift.tt/2X7m65c https://ift.tt/2XgT4VW

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
नवी दिल्ली देशातील दिग्गज उद्योजकांपैकी एक असलेल्या घराण्यात संपत्तीची विभागणी होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे वृत्त आहे. गोदरेज कुटुंबाकडे अनेक उद्योगांबरोबरच हजारो कोटी रुपयांच्या जमिनींची मालकीही आहे. मुंबईतील सर्वाधिक जमीन गोदरेज कुटुंबाकडेच आहे. या बाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, संपत्तीच्या विभागणीसाठी गोदरेज कुटुंबीयांनी अनेक सल्लागार आणि आघाडीच्या कायदेविषयक कंपन्यांची सेवा घेतली आहे. गोदरेज कुटुंबाच्या संपत्तीच्या वाटपाबाबत आलेल्या वृत्तांनुसार, मुंबईतील विक्रोळी येथे गोदरेज कुटुंबाकडे विकसित करण्याजोगा १००० एकरचा भूखंड आहे. या भूखंडाची बाजारातील किंमत आहे २० हजार कोटी रुपये. तसे पाहता विक्रोळीत या कुटुंबाकडे एकूण ३४०० एकर जमीन आहे. या बाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वाटपासाठी गोदरेज अॅण्ड बॉयसचे चेअरमन जमशीद गोदरेज हे जेएम फायनान्सशी संबंधित मोठे गुंतवणूकदार निमेश कम्पानी आणि एजेबी पार्टनर्सचे वकील जिया मोदी यांचा सल्ला घेत आहेत. त्यांचे चुलत भाऊ आणि गोदरेज समूहाचे चेअरमन आदि गोदरेज आणि गोदरेज अॅग्रोव्हॅटचे चेअरमन नादिर गोदरेज बँकर उदय कोटक आणि सिरिल अमरचंद मंगलद यांच्याशी संबंधित सिरिल श्रॉफ यांचा सल्ला घेत आहेत. काय आहे वाद? या बाबत इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जमिनींचा विकास नेमका कशा प्रकारे करायचा याबाबत गोदरेज कुटुंबात वाद आहेत. या जमिनींवर रिअर इस्टेटचा अधिक प्रमाणात विकास होता कामा नये, असे जमशीद गोदरेज यांचे म्हणणे आहे. मात्र, आदि आणि नादिर गोदरेज यांच्या कुटुंबियांचा रिअल इस्टेट विकासाकडे ओढा आहे. गुरुवारी दोन्ही परिवार निवेदन प्रसिद्ध करणार आहेत, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्याने दिली. १.२ लाख कोटींचा समूह गोदरेज समूह १२२ वर्षे जुना आहे. सन १८९७ मध्ये तरुण पारशी वकील आर्देशीर गोदरेज यांनी एका कुलुपाच्या कंपनीसह गोदरेजची सुरुवात केली. गोदरेज समूहात पाच कंपन्या आहेत. यात गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कंझ्यूमर, गोदरेज अॅग्रोव्हेट, गोदरेज प्रॉपर्टीज आणि एस्टेक लाइफसायंसेस या कंपन्यांचा समावेश आहे. असे आहे गोदरेज कुटुंब गोदरेज कुटुंबात चेअरमन आदि गोदरेज आणि त्यांचे बंधू नादिर यांच्या व्यतिरिक्त चुलत भाऊ रिशद, जमशीद, स्मिता गोदरेज यांचा समावेश आहे. आदि यांना तान्या, निसाबा आणि पिरोजशा अशी अपत्ये आहेत. नादिर यांनाही तीन मुले आहेत. जमशीद यांना रायका आणि नवरोझ अशी दोन मुले, तर स्मिता यांना फ्रेयान आणि निरिका अशी अपत्ये आहेत.

https://ift.tt/2X7m65c

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages