बँकांना ऑक्टोबरमध्ये ११ दिवस सुट्ट्या https://ift.tt/2mtdb1B https://ift.tt/2mutDP8 - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, September 27, 2019

बँकांना ऑक्टोबरमध्ये ११ दिवस सुट्ट्या https://ift.tt/2mtdb1B https://ift.tt/2mutDP8

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
नवी दिल्ली: ऑक्टोबरमध्ये बँकेची कामे हातावेगळी करण्याचे नियोजन करीत असाल, तर बँकांच्या सुट्ट्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. याचे कारण म्हणजे या महिन्यात बँका नेहमीपेक्षा अधिक दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. त्यातच ऑक्टोबरमध्ये आणि आदी मोठे सणही आल्याने बँका जवळपास ११ दिवस बंद राहणार आहेत. ऑक्टोबरमधील पहिली सुटी दोन ऑक्टोबरला गांधीजयंतीची आहे. त्यानंतर ६, ७ आणि ८ ऑक्टोबरला बँकांचे कामकाज बंद असेल. सहा ऑक्टोबरला रविवार असून, ७ ऑक्टोबरला महानवमी आणि ८ ऑक्टोबरला दसऱ्यानिमित्त बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर १२ ऑक्टोबरला महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी बँका बंद राहतील. १३ ऑक्टोबरला रविवार असल्यानेही बँका बंद असतील. २० ऑक्टोबरलाही रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातही सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. महिन्यातील चौथा शनिवार असल्याने २६ ऑक्टोबरला बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. दिवाळीला रविवारी (२७ ऑक्टोबर) सुरुवात होणार असून, २८ ऑक्टोबरला बलिप्रतिपदा आहे. २९ ऑक्टोबरला भाऊबीज असल्याने बँका बंद राहणार आहेत. या तिन्ही दिवशी बँकांचे कामकाज बंद असेल.

https://ift.tt/2mtdb1B

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages