आधार-पॅन कार्ड लिंक करण्यास मुदतवाढ https://ift.tt/2nsP43l https://ift.tt/2mATZiF - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, September 28, 2019

आधार-पॅन कार्ड लिंक करण्यास मुदतवाढ https://ift.tt/2nsP43l https://ift.tt/2mATZiF

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
नवी दिल्ली: क्रमांक आधारसोबत लिंक करण्यास अर्थमंत्रालयाने मुदतवाढ दिली आहे. आता ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत पॅन कार्ड-आधार लिंक करता येणार आहे. याआधी ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. याबाबत शनिवारी सीबीडीटीने एक परिपत्रक काढले आहे. पॅन कार्ड क्रमांक हा आधारसोबत लिंक करणे आवश्यक आहे. पॅन कार्ड आधार सोबत लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रीय होणार असल्यामुळे आर्थिक व्यवहार करताना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. आयकर विभागाच्या वेबसाइटवरून आधार-पॅन लिंक करता येईल. त्याशिवाय आधारसोबत लिंक करताना पॅन कार्ड आणि आधारमधील माहितीत कोणत्याही प्रकारची विसंगती नाही हे ही काळजीपूर्वक पाहावे लागणार आहे. दोन्ही कार्डमधील माहितीत तफावत असल्यास दुरूस्ती करता येणार आहे. आधारसोबत पॅन कार्ड लिंक न केल्यास आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड वापरता येणार नाही. आयकर खात्याने दिलेल्या माहितीनुसार ८.४७ कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांपैकी ६.७७ कोटी जणांनी पॅन कार्डला आधारसोबत लिंक केले आहे. आयकर खात्याकडून दहा आकडी पॅन क्रमांक दिला जातो. तर, आधार क्रमांक हा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथिरिटी ऑफ इंडियाकडून हा क्रमांक दिला जातो.

https://ift.tt/2nsP43l

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages