PMC: ६,५०० कोटींच्या गैरव्यवहाराची कबुली? https://ift.tt/2ophlsh https://ift.tt/2mQ2QNx - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, September 29, 2019

PMC: ६,५०० कोटींच्या गैरव्यवहाराची कबुली? https://ift.tt/2ophlsh https://ift.tt/2mQ2QNx

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
मुंबईः रिझर्व्ह बँकेने 'पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँके'वर () सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र, आता या बँकेत ६ हजार ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर येत आहे. पीएमसीचे माजी व्यवस्थापकीय संचालक यांनी यासंदर्भातील कबुली दिल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळखोरीत असलेल्या 'एचडीआयएल' कंपनीला पीएमसी बँकेने ६,५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे कर्ज दिल्याचे जॉय थॉमस यांनी रिझर्व्ह बँकेसमोर कथितरित्या मान्य केले आहे. बँकेच्या कर्ज वितरण नियमापेक्षा ही रक्कम चौपट असून, बँकेच्या एकूण कर्ज वितरणाच्या ७३ टक्के असल्याची माहिती समोर आली आहे. बँकेच्या संचालक मंडळातील एका सदस्याने बँकेच्या ताळेबंदाची प्रत रिझर्व्ह बँकेला दिली आहे. यामध्ये कंपनीला दिलेल्या कर्जाच्या सद्य स्थितीबद्दल सविस्तर माहिती आहे, असे या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका सूत्राकडून सांगण्यात आले. थॉमस यांनी रिझर्व्ह बँकेला साडेचार पानी पत्र लिहिले आहे. यामध्ये वरयाम सिंह आणि संचालक मंडळाच्या काही सदस्यांसह अन्य सहा जणांच्या साथीने एचडीआयएल समूहाला कर्ज वाटप करण्याची मंजुरी दिली. संचालक मंडळातील बहुतांश सदस्यांना या कर्ज वाटपाबाबत माहिती नसल्याचे थॉमस यांनी या पत्रात नमूद केले आहे, असेही सूत्राने सांगितले. एचडीआयएल समूहाला १९ सप्टेंबर २०१९ रोजी ६ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे थॉमस यांनी रिझर्व्ह बँकेसमोर कबूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सदस्याकडून सादर करण्यात आलेला ताळेबंद रिझर्व्ह बँकेकडून तपासला जात आहे. दरम्यान, सहा महिन्यातून एकदाच एक हजार रुपये काढण्याचे लादलेले आर्थिक निर्बंध पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेने (पीएमसी) अखेर अंशत: मागे घेतले आहेत. सहा महिन्यातून एकदा एक हजाराऐवजी दहा हजार रुपये काढण्याची मुभा पीएमसी बँकेने ग्राहकांना दिली आहे. आरबीआयच्या आदेशानंतर पीएमसीने ग्राहकांची त्यांच्या खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली. नव्या नियमानुसार ग्राहक आता पीएमसी बँकेतून सहा महिन्यातून फक्त दहा हजार रुपये काढू शकणार आहेत. तत्पूर्वी, आरबीआयने बँकेवर निर्बंध लादल्यानंतर मुंबईसह देशभरातील बँकेच्या शाखांसमोर खातेदार आणि ठेवीदारांची गर्दी झाली. सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ठेवीदार आणि व्यापारी अडचणीत आले आहेत. ठेवीदार, खातेदारांचे पैसे सुरक्षित आहेत, असे बँकेकडून सांगण्यात आले.

https://ift.tt/2ophlsh

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages