लिपस्टिकची वाढती विक्री आर्थिक मंदीचे द्योतक https://ift.tt/2HDZp3Q https://ift.tt/2HD6OQN - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, August 30, 2019

लिपस्टिकची वाढती विक्री आर्थिक मंदीचे द्योतक https://ift.tt/2HDZp3Q https://ift.tt/2HD6OQN

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
टाइम्स वृत्त, महिलांच्या सौंदर्य प्रसाधनांतील प्रमुख साधन असणाऱ्या लिपस्टिकने केंद्र सरकारच्या डोकेदुखीत भर घातली आहे. वाचून दचकलात ना! पण, हे खरे आहे. एकीकडे वस्त्रप्रावरणे, एफएमसीजी आणि ऑटो इंडेक्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण नोंदविण्यात आली असली, तरी इंडेक्समध्ये मात्र मोठी तेजी नोंदविण्यात आली आहे. देशात निर्माण झालेल्या आर्थिक सुस्तीला लिपस्टिक इंडेक्स कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. एका अहवालानुसार लिपस्टिकची विक्री वाढणे, हा अर्थव्यवस्था सुस्त असल्याचा संकेत मानला जातो. या अहवालानुसार भारतीय ग्राहक सध्या वाहने किंवा एफएमसीजी क्षेत्रातील वस्तूंच्या खरेदीपासून चार हात लांबच राहत आहे. दुसरीकडे मात्र, लिपस्टिकच्या विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. त्यातच सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीत वाढ होत असल्याने प्रत्येक ब्रँड एकाच उत्पादनाचे १५ ते २५ शेड्स सादर करीत आहे. ‘लॅक्मे’ या प्रसिद्ध ब्रँडच्या प्रीमियम लिपस्टिकची किंमत साधारणत: आठशे रुपयांच्या घरात आहे. काय आहे लिपस्टिक इंडेक्स? जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती जाणून घेण्यासाठी ‘लिपस्टिक इंडेक्स’चा आधार घेण्यात येत आहे. मंदी असूनही लॅक्मे, लॉरियलसह जगभरातील आघाडीच्या कॉस्मेटिक ब्रँडच्या मागणीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. अर्थतज्ज्ञांनी ‘लिपस्टिक इंडेक्स’च्या माध्यमातून मंदी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते व्यक्तीचे उत्पन्न घटले की कमी महत्त्वाच्या वस्तूंच्या (इन्फेरियर गुड्स) मागणीत वाढ होते. लिपस्टिकचा समावेश कमी महत्त्वाच्या वस्तूंमध्ये होत नाही. मात्र, अन्य महागड्या सौंदर्यप्रसाधनांच्या तुलनेत ती स्वस्त वस्तू आहे. व्यक्तींचे उत्पन्न घटताच सार्वजनिक बससेवेच्या वापरात वाढ होते. आणि उत्पन्न वाढताच व्यक्ती कार आणि दुचाकींची खरेदी करतात. विक्रीत किती वाढ? सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या लॅक्मे आणि लॉरियल आदी ब्रँडच्या लिपस्टिकच्या विक्रीत दोन अंकी वाढ नोंदविण्यात आली आहे. मंदीने ग्रासलेल्या अर्थव्यवस्थेचे निदर्शक असणाऱ्या लिपस्टिक इंडेक्सचा सर्वप्रथम प्रयोग ‘एस्टी लॉडर’चे माजी चेअरमन लिओनार्ड लॉडर यांनी २००१च्या जागतिक आर्थिक मंदीच्या वेळी सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीमध्ये झालेली वाढ समजावून सांगण्यासाठी केला होता. लिपस्टिक इंडेक्सनुसार असे मानले जाते की, मंदीच्या काळात महिला वर्ग कपडे आणि अन्य महागड्या फॅशनच्या ऐवजी लिपस्टिकवर अधिक खर्च करतो.

https://ift.tt/2HDZp3Q

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages