हवाहवाई! विमान कंपन्यांकडून सवलतींचा वर्षाव https://ift.tt/2PlqejC https://ift.tt/2zrFoJ5 - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, August 28, 2019

हवाहवाई! विमान कंपन्यांकडून सवलतींचा वर्षाव https://ift.tt/2PlqejC https://ift.tt/2zrFoJ5

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
वृत्तसंस्था, नवी दिल्ली तुम्ही जर सुट्टीवर जाण्याचा विचार करीत, असाल तर विमानाची तिकीटे आरक्षित करण्याची हीच चांगली संधी आहे...त्याचे कारण म्हणजे बहुतांश प्रवासी विमान कंपन्या मोठ्या प्रमाणावर सवलतींचा वर्षाव करीत आहेत. एका खासगी ट्रॅव्हल पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार एअर इंडिया, स्पाइसजेट, एअर एशिया आणि इंडिगोतर्फे ग्राहकांसाठी अनेक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. ‘यात्रा डॉट कॉम’वर सुरू असलेल्या सेलनुसार एअर इंडिया, स्पाइसजेट, एअर एशियाच्या एक वेळच्या देशांतर्गत प्रवासासाठीच्या तिकिटावर सवलत उपलब्ध झाली असून, १,०२० रुपयांपासून तिकिटे उपलब्ध आहेत. सवलतीचा लाभ घेण्यासाठी १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत तिकिटांची खरेदी करणे आवश्यक आहे. स्पाइसजेट स्पाइसजेटतर्फे देशांतर्गत प्रवासासाठीचे तिकीट १२९९ रुपयांपासून उपलब्ध करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय प्रवासाठीच्या तिकिटांची सुरुवात ३,९९९ रुपयांपासून सुरू आहे. ही ऑफर ३० ऑगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३० ऑगस्टपर्यंत नोंदणी केलेल्या तिकिटांवर ३१ मार्च २०२० पर्यंत प्रवास करता येणार आहे. एअर एशिया एअर एशियाच्या काही निवडक मार्गांवरील सर्व उड्डाणांसाठी २० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या ऑफरचा फायदा एक सप्टेंबरपर्यंत घेता येणार आहे. देशांतर्गत प्रवासासाठीच्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना २ ते २६ सप्टेंबर या कालावधीतच तिकिटे खरेदी करावी लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय मार्गांवरील सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी खरेदी केलेल्या तिकिटांवर २ सप्टेंबर ते १९ नोव्हेंबर २०१९ या कालावधीतत प्रवास करावा लागणार आहे. इंडिगो इंडिगोनेही आंतरराष्ट्रीय मार्गांवरील प्रवासासाठी ३,९९९ रुपयांपासून तिकिटे उपलब्ध करून दिली आहेत. ही सुविधा केवळ इंडिगो एक्स इंडिया नेटवर्कच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या विनाथांबा उड्डाणांसाठीच असणार आहे. त्यासाठी १५ दिवसांपूर्वी काढण्यात आलेली तिकिटेच ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या ऑफरचा लाभ २६ ऑगस्ट २०१९ ते २१ मार्च २०२० या कालावधीतच घेता येणार आहे.

https://ift.tt/2PlqejC

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages