स्विस बँकेत कुणाचा किती ब्लॅकमनी?; उद्या कळणार? https://ift.tt/2LjfWv4 https://ift.tt/2zE0C6J - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, August 31, 2019

स्विस बँकेत कुणाचा किती ब्लॅकमनी?; उद्या कळणार? https://ift.tt/2LjfWv4 https://ift.tt/2zE0C6J

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
नवी दिल्ली: देशातील काळ्यापैशाला लगाम घालण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नोटबंदी आणि बेहिशोबी मालमत्तेबाबतचे अनेक निर्णय घेतले. मात्र त्याने काहीच फरक पडला नसला तरी भारतासाठी आणखी एक दिलासादायक बातमी आहे. स्विस बँकेत किती भारतीयांचा किती आहे, याची माहिती उद्या मिळण्याची शक्यता आहे. स्विस बँकेत पैसा ठेवणाऱ्या भारतीयांची यादी उद्या भारताच्या टॅक्स अधिकाऱ्यांना मिळणार असल्यानं अनेक ब्लॅकमनीवाल्यांची पोलखोल होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. काळ्यापैशाच्या विरोधात सरकारच्या लढाईला यश आलं असून काळ्यापैशाच्या स्विस बँकेतील गोपनीयतेच्या युगाचा सप्टेंबरपासून अस्त होणार असल्याचं प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी)ने म्हटलं आहे. याशिवाय २०१८मध्ये ज्या भारतीयांनी स्विस बँकेतील खाती बंद केली आहेत, त्यांचीही नावं मिळणार असल्याचं सीबीडीटीने म्हटलं आहे. आयकर विभागासाठी सीबीडीटीकडून धोरण बनविलं जातं. सूचनेचं आदान-प्रदान करण्याची व्यवस्था सुरू होण्यापूर्वी भारतात आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका शिष्टमंडळाने भारताचे महसूल सचिव ए.बी. पांडेय, बोर्ड चेअरमन पी. सी. मोदी आणि बोर्डाचे सदस्य अखिलेश रंजन यांच्याशी चर्चा केली. यावेळी स्वित्झर्लंडच्या कर विभागाचे उपप्रमुख निकोल मारिओही उपस्थित होते. जूनमध्ये लोकसभेत स्टँडिंग कमिटीचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानुसार १९८० पासून ते २०१०पर्यंत म्हणजे गेल्या ३० वर्षांत भारतीयांनी स्विस बँकेत १७,२५,३०० कोटी रुपयांपासून ते ३४,३०,३०० कोटी रुपये ठेवले असल्याचं म्हटलं होतं. उद्या स्विस बँकेकडून या ब्लॅकमनीची लिस्ट मिळाल्यास नेमका आकडा समजण्यास मदत होणार आहे. रिअल इस्टेट, कोळसा, फार्मासिटीकल, पान मसाला, गुटखा, तंबाखू, कमोडिटी, शिक्षण आणि फिल्म आदी क्षेत्रात सर्वाधिक काळापैसा असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

https://ift.tt/2LjfWv4

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages