मोदी सरकार नवीन १०० विमानतळ बनवणार https://ift.tt/2BVw2GQ https://ift.tt/2JzhJMi - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, October 30, 2019

मोदी सरकार नवीन १०० विमानतळ बनवणार https://ift.tt/2BVw2GQ https://ift.tt/2JzhJMi

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
नवी दिल्लीः पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार लवकरच धाडसी निर्णय घेणार आहेत. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदी सरकारने काम करणे सुरू केले आहे. केंद्रातील मोदी सरकार २०२४ पर्यंत देशभरात नवीन १०० (एअरपोर्ट) बनवण्याचा विचार करीत आहे. सरकार हा निर्णय लवकरच घेणार असून एक हजार नवीन मार्ग बनवण्याचाही विचार करीत आहे. हे मार्ग छोट्या शहरांना तसेच गावांना जोडण्याचे काम करणार आहे. ब्लूमबर्गच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या एका बैठकीत २०२५ पर्यंत गरजेच्या इन्फ्रास्ट्रक्चरची समीक्षा करण्यात आली. बैठकीत सहभागी झालेल्या एका अधिकाऱ्यांनी ही माहिती नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली आहे. देशात विमान भाडे फायनान्सियल बिझनेस यावरही चर्चा करण्यात आली, असे या अधिकाऱ्याने सांगितले. नवीन विमानतळ सुरू करण्याबरोबरच प्रत्येक वर्षी ६०० पायलट यांना स्थानिक स्तरांवर प्रशिक्षित करण्याचा प्रस्ताव दिला जाईल. तसेच पाच वर्षात विमानांची संख्या दुप्पट करून ती १२०० पर्यंत पोहोचवण्यात येणार आहे, यावरही चर्चा करण्यात आली आहे. अर्थव्यवस्थेला उभारी देणे सध्या खूप गरजेचे आहे. अर्थव्यवस्थेत सुधार आणण्यासाठी मोदी सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकार इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमधून याला गती देण्याचे काम करणार आहे. सरकारने गेल्या सहा महिन्यात कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्याचा धाडसी आणि चांगला निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पत्रकार परिषद घेऊन या टॅक्समध्ये कपात करण्यात येत असल्याची घोषणा केली होती. या निर्णयाचे उद्योग क्षेत्रातून स्वागत करण्यात आले होते. ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटले आहे की, शेजारी असलेल्या चीन या देशात विमानतळांची संख्या वेगाने वाढत आहे. चीनमध्ये २०३५ पर्यंत ४५० व्यावसायिक विमानतळ बनवण्याचे लक्ष्य आहे. म्हणजेच ते २०१८ च्या तुलनेत दुप्पट आहे. तीन वर्षापर्यंत भारतात केवळ ७५ रनवे काम करीत होते. मोदी सरकारने आतापर्यंत ३८ नवीन विमानतळ देशभरात जोडण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट ला लाल किल्ल्यावरून भाषण करताना पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्याचा दावा केला होता. संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी देशासमोर पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले होते.

https://ift.tt/2BVw2GQ

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages