प्रसिद्ध आयटी कंपनी 'कॉग्निझंट'मध्ये कर्मचारी कपात; ७ हजार जणांना देणार नारळ https://ift.tt/2Wrp7P0 https://ift.tt/2pj35Cb - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, October 31, 2019

प्रसिद्ध आयटी कंपनी 'कॉग्निझंट'मध्ये कर्मचारी कपात; ७ हजार जणांना देणार नारळ https://ift.tt/2Wrp7P0 https://ift.tt/2pj35Cb

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
जोशेल मेंडोंका, बेंगळुरू: अमेरिकन आयटी कंपनी आगामी काही महिन्यांत कॉस्ट कटिंगच्या नावाखाली सात हजार मध्यम-वरिष्ठ कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. याशिवाय कंपनी कंटेट मॉडरेशन बिझनेसमधून बाहेर पडण्याचा विचारही करत आहे. कंपनीनं बुधवारी ही माहिती दिली. आगामी काही महिन्यांत जगभरातून १२ हजार मध्यम आणि वरिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतल्याचंही कंपनीनं सांगितलं. पाच हजार कर्मचाऱ्यांची पुन्हा भरती कॉग्निझंट कंपनीनं यासंबंधी एक परिपत्रक काढलं आहे. त्यात त्यांनी करण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं आहे. या कर्मचाऱ्यांमधून पाच हजार जणांना पुन्हा प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील कौशल्य वाढवण्यात येईल आणि त्यांची पुन्हा भरती केली जाईल. यापूर्वी मे मध्येही कंपनीनं कॉस्ट कटिंगच्या नावाखाली मध्यम पदावरील अधिकाऱ्यांना नारळ दिला होता. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत कंपनीच्या कामगिरीत चांगली सुधारणा झालेली आहे. एकूण महसूल ४.२५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. गेल्या तिमाहीत कंपनीचा महसूल ४.१४ अब्ज डॉलर इतका होता. कंपनीत जवळपास दोन लाख भारतीय कर्मचारी कॉग्निझंटचे नवे सीईओ ब्रायन हम्फ्रिज यांनी गेल्या काही दिवसांत कंपनीला नफा मिळवून देण्यासाठी पुनर्गठणची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी कॉस्ट कटिंगचा मार्ग स्वीकारला होता. या कंपनीत जवळपास २.९ लाख कर्मचारी काम करतात. त्यात जवळपास दोन लाख कर्मचारी हे भारतीय आहेत. ३० सप्टेंबर २०१९ रोजी कंपनीत कर्मचाऱ्यांची एकूण संख्या २, ८९, ९९० होती. तर ३० जून २०१९ रोजी कंपनीत एकूण २, ८८, २०० कर्मचारी होते.

https://ift.tt/2Wrp7P0

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages