म्युच्युअल फंड: छोटी गुंतवणूक, मोठा परतावा https://ift.tt/2JGhNtJ https://ift.tt/2owyzEe - Walletnews For Me

News regarding money,markets and finance

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, October 31, 2019

म्युच्युअल फंड: छोटी गुंतवणूक, मोठा परतावा https://ift.tt/2JGhNtJ https://ift.tt/2owyzEe

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times
म्युच्युअल फंडामध्ये ५०० रुपयांच्या लहान रकमेद्वारे सुरू केलेली छोटी व नियमित गुंतवणूकही काळाच्या ओघात मोठा परतावा देऊ शकते. याचे मुख्य कारण म्हणजे या गुंतवणुकीत चक्रवाढ पद्धतीने होणारी वाढ. त्यामुळे या गुंतवणूक पर्यायाच्या माध्यमातून आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करता येणे शक्य आहे. म्हणजे काय? म्युच्युअल फंड हे गुंतवणूकीचे असे साधन आहे ज्यात गुंतवणूकदार ठरावीक कालावधीत पैसे मिळविण्यासाठी पैसे गुंतवतात. संकलित केलेला निधी गुंतवणूक व्यावसायिकांद्वारे संचालित केला जातो. हे पैसे रोखे, स्टॉक, सोने आणि इतर मालमत्ता अशा विविध सिक्युरिटीजमध्ये गुंतवले जातात आणि त्यातून परतावा दिला जातो. या गुंतवणूकींमधून झालेला नफा किंवा तोटा गुंतवणूकदारांनी फंडामध्ये दिलेल्या योगदानाच्या प्रमाणात विभागला जातो. म्युच्युअल फंडाचे विविध प्रकार कोणते? म्युच्युअल फंडाचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत, डेट फंड्स, इक्विटी फंड आणि हायब्रीड फंड. डेट फंड्स हे सरकारी सिक्युरिटीज आणि कॉर्पोरेट रोख्यांसारख्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात. या फंडांचे उद्दिष्ट गुंतवणूकदारास कमी जोखमीत वाजवी परतावा देणे हे असते. इक्विटी फंड समभागात गुंतवणूक करतात आणि गुंतवणूकदारांना भांडवल मूल्यवृद्धी देतात. इक्विटी फंडावरील परतावा हा बाजारातील स्थित्यंतराशी निगडित असल्याने या फंडांमध्ये जास्त धोका असतो. हायब्रीड फंड हे इक्विटी आणि निश्चित उत्पन्न देणाऱ्या सिक्युरिटीजमघ्ये गुंतवणूक करतात. यात इक्विटीचे प्रमाण ० ते १०० टक्के असे कितीही असू शकते. यात गुंतवणूक करण्याचे कोणते फायदे आहेत? बहुतांश गुंतवणूकदारांना स्वत:चे निधी व्यवस्थापन करणे शक्य नसते. कंपन्यांचा अभ्यास, त्यांचे विश्लेषण करणे आणि वेगवेगळ्या सिक्युरिटीज खरेदी/विक्रीसंबंधी व्यवहार करण्यासाठी पुरेसे ज्ञान लागते. कोणताही म्युच्युअल फंड हा नाममात्र शुल्कात व्यावसायिक सल्ला देतो. संबंधित फंड मॅनेजर तुमच्यासाठी कंपन्यांचे समभाग खरेदी करतो किंवा विकतो, त्यांचे विश्लेषण करतो आणि नियमितपणे त्यांचा मागोवा घेतो. दुसरे म्हणजे, यामुळे आपल्या गुंतवणुकीमध्ये विविधता येते. केवळ एका इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्यास बाजार कोसळल्यानंतर मोठा आर्थिक फटका बसू शकतो. तथापि, विविध मालमत्ता प्रकारांत गुंतवणूक केल्यास पोर्टफोलिओमध्ये वैविध्य निर्माण होते व जोखीमही घटते. आपण समभागांमध्ये गुंतवणूक करत असाल आणि आपल्याला विविधता साधायची असेल तर आपल्याला वेगवेगळ्या सेक्टरमधील किमान १० स्टॉक निवडावे लागतील. ही एक दीर्घकालीन प्रक्रिया असू शकते. उदाहरणार्थ निफ्टीचा मागोवा घेणाऱ्या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केली तर आपल्या खात्यात विविध सेक्टरमधील पन्नासहून अधिक समभाग जमा होऊ शकतात. यामुळे जोखीम बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. या फंडांमधून खात्रीशीर परतावा मिळतो का? म्युच्युअल फंड शेअर बाजारातील कामगिरीशी निगडित असल्याने गुंतवणूकदारांना परताव्याची हमी देऊ शकत नाहीत. म्हणूनच बाजार तेजीत असेल आणि चांगली कामगिरी करत असेल फंडाच्या मूल्यामध्ये वाढ दिसून येते. तथापि, बाजाराच्या खराब कामगिरीचा गुंतवणूकीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पारंपरिक गुंतवणुकीप्रमाणे म्युच्युअल फंड भांडवल सुरक्षेची हमी देत नाहीत. म्हणूनच गुंतवणूकदारांनी आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करू शकतील अशा फंडांचा अभ्यास करून त्यात गुंतवणूक करावी.

https://ift.tt/2JGhNtJ

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages